कुणकेश्वर यात्रा उत्सव यावर्षी गाव स्तरावरच साध्या पद्धतीत साजरा होणार…

देवगड दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रोत्सव दि.११ मार्च ते १३ मार्च या कालावधीत संपन्न होत असून चालू वर्षी कोरोना पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा उत्सव ग्रामस्तरावर साध्या पद्धतीने साजरा करण्यात येऊन भाविकांना मुखदर्शन व बाहेरील व्यापारी वर्ग, तसेच देवस्वाऱ्या याना यात्रा उत्सवात परवानगी देण्यात येणार नाही जेणेकरून या ठिकाणी गर्दी न होता आरोग्याची खबरदारी घेत शासन प्रशासन यांच्या सूचनांचे पालन करून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान ट्रस्ट तसेच स्थानिक ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन,व ग्रामस्थांच्या सहकार्याने पार पाडण्यात यावी असे आवाहन देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी यांनी श्री देव कुणकेश्वर यात्रा नियोजनाच्या आढावा बैठकीत केले. श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री उत्सव दि.११मार्च ते १३ मार्च या कालावधीत संपन्न होत आहे.त्या अनुषंगाने या यात्रा नियोजन आढावा बैठकीचे आयोजन श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट सभागृहात देवगड उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.या वेळी व्यासपीठावर तहसीलदार मारुती कांबळे, सहा. पोलीस निरीक्षक संजय कातीवले पंचायत समिती अधीक्षक संतोष बिर्जे,,देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संजय वाळके,सरपंच चंद्रकांत घाडी,उपसरपंच संदीप आचरेकर,दिनेश धुवाळी, बाळकृष्ण मुणगेकर,ग्रामसेवक पांडुरंग शेडगे,उपस्थित होते. या वेळी यात्रा कालावधीत सहभागी असणारी विविध खाती यात ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, सा. बा. खाते, जि. प.बांधकाम,रापम महामंडळ,आरोग्य विभाग,यांचा नियोजनआढावा घेण्यात आला तसेच संबंधितांनी योग्य ती कार्यवाही करून अहवाल तहसीलदार कार्यालयाकडे सादर करण्याचा सूचना करण्यात आली.या वेळी बोलताना उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील म्हणाले,कोरोना संक्रमण पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने ग्रामस्तरावर पार पडणार असणाऱ्या या यात्रेत बाहेरील भाविकांनी गर्दी करू नये ,तसेच बाहेरील व्यापारी, देवस्वाऱ्या याना परवानगी देण्यात येऊ नये.स्थानिक व्यावसायिक यांची रचना सामाजिक अंतर राखत करण्यात यावी मास्क,सॅनिटायझर चा वापर दर्शन रांगा ,प्रवेशद्वार,मंदिर परिसर या सर्व ठिकाणी करण्यात यावा.दर दोन तासांनी सर्व परिसर निर्जंतुकीकरण करण्यात यावा.अशीही सूचना केली

You cannot copy content of this page