विद्युत खांबावर अचानक शॉर्टसर्किट

बांदा शहरातील घटनेने खळबळ

बांदा/प्रतिनिधी
बांदा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या महावितरणच्या विद्युत खांबावर अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. याठिकाणी बाजारपेठ असल्याने लोकांची वर्दळ मोठ्या संख्येने असते. तात्काळ विद्युत कर्मचाऱ्यांनी याठिकाणी धाव घेत वीज पुरवठा बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.

You cannot copy content of this page