क्षय रोगमुक्त जिल्ह्यासाठी पुढाकार

मातृत्व वरदान फाऊंडेशन आणि जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाचा पुढाकार

⚡मालवण ता.१६-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात क्षय रुग्णाचे प्रमाण अधिक असून टी.बी. मूक्त भारत अभियाना मध्ये भाग घेऊन जिल्ह्यातील क्षय रुग्ण दत्तक घेऊन त्यांना मातृत्व वरदान फाऊंडेशन, मालवण व जिल्हा पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून कोरडा आहार दरमहा पुरविला जाणार आहे या योजनेच्या माहिती साठी दिनांक १७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता हॉटेल श्री महाराज मालवण येथे आरोग्य अधिकारी उपस्थित राहून सदर योजने विषयी मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच मातृत्व वरदान फाउंडेशन व पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या क्षय रुग्णांना फूड बास्केट किट आरोग्य अधिकारी मार्फत वितरित केले जाणार आहे, अशी माहिती मातृत्त्व वरदान फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ. वैष्णवी विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री टी.बी.मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ केला असून क्षय रुग्णांना अतिरिक्त सहाय्य मिळावे यासाठी समाजातील सहकारी ,संस्था, वैयत्तिकरित्या क्षय रुग्णांना सहाय्य करून निक्षय मित्र बनू शकतो या माध्यमातून क्षय रुग्णांना ६ महीने ते ३ वर्षे फूड बास्केट च्या माध्यमातून कोरडा आहार पुरविला जाऊ शकतो. तसेच सदर योजनेत भाग घेणाऱ्या इच्छूक व्यक्ती ,संस्थाचा सहभाग घेतला जाणार आहे. अधिकाधिक संस्था, व्यक्तीनी सदर फूड बास्केट अभियानात भाग घेऊन टी.बी मुक्त भारत अभियानात सहभाग घ्यावा. अधिक माहिती साठी ८२७५१०६३७५ या क्रमांकवर संपर्क करावा, असे आवाहन अध्यक्ष सौ.वैष्णवी मोंडकर व उपाध्यक्ष मेघा सावंत यांनी केले आहे.

You cannot copy content of this page