संजू परब; केसरकरांचा दहशतवाद संपला आता त्यांनी सौंदर्यावर बोलू नये…
सावंतवाडी ता.१०-: मोती तलावाच्या काठावरील आठवडा बाजार हा नागरिकांना सोयीस्कर आहे, त्यामुळे कुठलही सौंदर्य अबाधित होण्याचा प्रश्न नाही, केसरकर आता राज्याचे नेते आहेत त्यांनी बाजाराबाबत लुडबूड न करात बेरोजगारांना रोजगार द्यावा उगाच आठवडा बाजार अन्यत्र हलविल्यास भाजपाचा त्यास कडाडून विरोध राहील असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा भाजपा प्रवक्ते संजू परब यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
ते म्हणाले, मंत्री केसकर आणि अलीकडेच आठवडा बाजार दुसरीकडे हलविण्याबाबत आपण ठाम असल्याचे जाहीर केले मात्र की सरकारने जनतेला फसवण्याचे सोडून द्यावे जनता तुम्हाला कंटाळली आहे एवढे दिवस दहशतवाद दहशतवाद करून राजकारण करणाऱ्या केसरकारांनी आता मोती तलावाच्या सौंदर्यावर बोलण्यास सुरुवात केली आहे.
एका दिवसाच्या आठवड्या बाजाराने मोती तलावाचे सौंदर्य बाधित होणार नाही ज्यावेळी आठवडा बाजार भरतो त्यानंतर ताबडतोब पालिका प्रशासनाकडून त्या ठिकाणी स्वच्छता केली जाते त्यामुळे कुठल्याही प्रकारे अस्वच्छता ही तिथे होत नाही पूर्वी ज्या ठिकाणी हा बाजार भरत होता तेथे महिला वर्गांना होणारा त्रास त्यांच्या बाबतीत होणारे गैरप्रकार व अन्य गोष्टींचा विचार करून हा आठवडा बाजार तलावाच्या काठी भरवण्यात आला गेली दोन वर्ष कुठल्याही प्रकारची तक्रार न येता हा आठवडा बाजार येथे सुरळीत सुरू आहे व्यापारी वर्ग नागरिकांनाही हा बाजार योग्य आणि सोयीचा असावा वाटतो त्यामुळे केसरकारांनी जनतेला दिलेली आश्वासने आणि रोजगारा उपलब्ध करून देण्याबाबतच बोलावे उगाच आठवड्या बाजारासारख्या विषयावर करू नये.
श्री परब पुढे म्हणाले, आम्ही सत्तेत आल्यानंतर मुख्याधिकारी त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून आठवडा बाजार तलावा काटे भरवण्याबाबत निर्णय घेतला होता तसा ठरावाही आम्ही कौन्सिल मध्ये घेतला आहे सद्यस्थितीत हा आठवडा बाजार होळीचा खुंठ येथे हलवण्याबाबत हालचाली सुरू आहेत मात्र तेथील जागेचा विचार करता तेथे असणारी स्वच्छतागृहांची वानवा तसेच मुख्य बाजारापासून ही जागा दूर असल्याने तेथे रिक्षा आधी बाबत होणारी गैरसोय हे विषय प्रामुख्याने पुढे येणार आहेत. त्यामुळे तलावाकाठील आठवडा बाजार
दुसरीकडे हलवताना आम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा अन्यथा भाजपाचा त्याला विरोध राहणार आहे.
