देवगड तालुक्यासाठी स्वतंत्र उपविभागीय अधिकारी म्हणून सुधीर पाटील यांची नेमणूक

*💫देवगड दि.१६-:* देवगड तालुक्याकरिता सुधीर सुभाष पाटील (परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी) यांची स्वतंत्र उपविभागीय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही नेमणूक २७आठवड्यांकरिता असून या कालावधीत महसूल विषयक उपविभागीय अधिकारी कणकवली यांचेकडील देवगड तालुका कक्षेतील सर्व कामकाज पहाणार असून त्याकरिता अर्जदार,किंवा अभ्यागत याना अकृषक परवाना,विविध दाखले,गौण खनिज चलन मंजुरी,फौजदारी कामकाज,याकरिता कणकवली येथे जावे लागणार नाही.उपविभागीय यांचे अखत्यारीत येणारे देवगड तालुक्यातील कार्यालयीन कामकाजाकरीता देवगड तहसील कार्यालय येथे संपर्क साधण्याचे आवाहन महसूल विभागाकडून करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page