धोकादायक वळणावरील झाडी तरुणांनी श्रमदानातून तोडली…

*💫मालवण दि.१६-:* मालवण-आचरे मार्गावरील हडी व कांदळगाव या गावांच्या हद्दीवर ‘वेशी’ या ठिकाणी कांदळगावातील तरुणांनी एकत्र येऊन श्रमदानाने धोकादायक वळणावर असलेली झाडी तोडली.गेल्याच आठवड्यात दुचाकी आणि बोलेरो पिकअप यांच्यात गंभीर अपघात होऊन याच वळणावर तारकर्ली येथील तरुणाला प्राण गमवावे लागले होते. भविष्यात असे अपघात होऊ नयेत व वाहनचालकांना समस्या येऊ नियेत, यासाठी या अपघाती वळणावरील झुडपे तोडून रस्ता मोकळा केला. मार्गावरील वाहन चालकांनी या किार्याचे कौतुक करत आभार मानले. या श्रमदानात माजी सभापती उदय परब कांदळगावचे माजी सरपंच कृष्णा राणे, उमेश परब, महेश आयकर, प्रवीण त्रपारकर महेश परुळेकर, संभाजी डिचवलकर, नितीन उनारिंग्रेकर, हिरोजी नारिग्रेकर, भाऊ सातार्डेकर, विशाल राणे, रोहन राणे, सिद्धेश कदम, जनार्दन मेस्त्री, संतोष बिजापुरे, शफी शेख यांनी सहभाग घेतला.

You cannot copy content of this page