सांगली जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुखपदी आमदार वैभव नाईक यांची नेमणूक…_

शिवसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान;मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची घोषणा

*💫कुडाळ दि.१६-:* शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान २०२१ ची घोषणा केली आहे. संपूर्ण राज्यभर हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानासाठी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे तरुण आमदार वैभव नाईक यांना सांगली जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सांगली जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुख म्हणून आमदार वैभव नाईक यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अभियानांतर्गत आ.वैभव नाईक सांगली जिल्हा दौरा करणार असून सांगली जिल्ह्यामधील शिवसेना जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख यांच्या विविध कामाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवसेनेचे काही खासदार व आमदार यांच्याकडे संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसंपर्क अभियान राबविण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामध्ये आमदार वैभव नाईक यांच्या कार्याची दखल घेऊन सांगली जिल्हा शिवसंपर्क अभियान प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page