कुडतरकर टेंब ग्रामपंचायतीचा सुंदर गाव म्हणून गौरव…

आर.आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत मिळाला मान

*💫सावंतवाडी दि.१६-:* आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेंतर्गत सन २०१९-२० मध्ये तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये सावंतवाडी तालुक्यातून सर्वाधिक गुण प्राप्त केल्याने कुडतरकर टेंब ग्रामपंचायतीस तालुकास्तरावरील सुंदर गाव म्हणून गौरविण्यात आले आहे. ओरस येथील जिल्हा नियोजन सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, उप मुख्यकार्यकारी अधिकारी दीपाली पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page