आर ओ डब्ल्यू च्या आतील बांधकाम प्रकरण;हटाव मोहिमेविरोधात राजकीय दबाव असल्याची शहरात चर्चा
*💫कणकवली दि.१६-:* शहरातील हायवे चौपदरीकरण च्या आर ओ डब्ल्यू लाईन च्या आतील इमारत बांधकाम आणि अतिक्रमण हटाव मोहिमेला आजही मुहुर्त हुकला आहे. कणकवली शहरातील आर ओ डब्ल्यू लाईन च्या आतील बांधकामे व अतिक्रमण हटविण्यासाठी हायवे प्राधिकरण ने 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीदरम्यान पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती.मात्र प्रत्यक्षात पोलीस बंदोबस्त मंजूर करूनही 15 फेब्रुवारी रोजी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली नाही.इमारत बांधकाम तोडण्यासाठी आवश्यक सामुग्रीत बिघाड झाल्याचे कारण सांगण्यात आले होते. आज दुसऱ्या दिवशीही आर ओ डब्ल्यू लाईन च्या आतील बांधकाम हटविण्याबाबत काहीच हालचाल दिसली नाही. या मोहिमेला सुरुवात न होण्यामागे राजकीय दबाव असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
