रामाचा धनुष्यबाण रावणाच्या हातात रहाणार नाही…

शुभाष देसाई; विजय सच्च्या शिवसैनिकांचाच असेल

⚡देवगड ता.२६-: देवगड तालुक्यातील सरपंच,
नगराध्यक्ष, नगरसेवक यांचे समवेत तालुक्यातील शिवसैनिक असून उडाले ते कावळे राहिले ते मावळे त्या मावळ्यांना सोबत घेऊन शिवसेनेचे निष्ठावंत खंबीर शिवसैनिक पुढे चालत राहतील आणि आमचे चिन्ह आमच्या मागून येईल.हा रामाचा धनुष्यबाण रावणाच्या हातात रहाणार नाही विजय हा सच्चा शिवसैनिकांचाच असेल ,
माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या शेवटच्या दसरा मेळाव्याच्या भाषणात म्हणाले होते. मात्र शिवसेनेने ज्यांना मोठे केले त्यांनीच बाळासाहेबांचे शब्द विसरून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खूपसत आणि भाजपच्या साथीने दगाबाजी करून उद्धव ठाकरे यांचे सरकार खाली खेचले. गद्दारांनी खोटेपणाने शिवसेनेचे नाव व चिन्ह चोरले आहे, मात्र त्यांना बाळासाहेबांनी रुजविलेला शिवसेनेचा विचार चोरता येणार नाही. अशा खोकेवाल्या गद्दारांना गाडल्याशिवाय आणि उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनविल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी देवगड येथे बोलताना केले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे सुरू असलेल्या शिवगर्जना या मोहिमे अंतर्गत देवगड येथील इंद्रप्रस्थ हॉल मध्ये मेळावा संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सुभाष देसाई हे बोलत होते. या मेळाव्याचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले., जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते,शिवसेना नेते अतुल रावराणे,संदेश पारकर जिल्हा युवासेना प्रमुख सुशांत नाईक,युवासेना उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडे महिला जिल्हासंघटक नीलम ताई सावंत पालव तालुका प्रमुख मिलिंद साटम, जयेश नर नगराध्यक्षा साक्षी प्रभू,उपनगराध्यक्ष मिताली सावंत महिला तालुका संघटक हर्षा ठाकूर,स्वप्नाली वाल्मिकी नगरसेवक निवृत्ती तारी, आदी व इतर उपस्थित होते. यावेळी सुभाष देसाई यांचा सत्कार देवगड तालुका ठाकरे सेना याच्या वतीने.देवगड सरपंच उपसरपंच ,नगरपंचायत यांच्या वतीने करण्यात आला.


या पुढे बोलताना श्री देसाई म्हणाले,गद्दारांनी शिवसेनेचे चिन्ह व नाव चोरले. चोरलेल्या धनुष्यबाणाचा उपयोग काय? नाव चोरा, निशाणी चोरा, जनता त्यास भीक घालत नाही. जनता ही उद्धव ठाकरेंच्याच बाजूने आहे. म्हणूनच अंधेरीच्या निवडणुकी नंतर निवडणूक घेण्याची भाजप व शिंदेची हिंमत नाही. भाजपचे लोकही निवडणुकीला घाबरत आहेत. आज उद्धव ठाकरेंना यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री तसेच ममता बॅनर्जी, केरळचे मुख्यमंत्री स्टॅलिन, नितीश कुमार आदी नेते पाठिंबा देत आहेत. जेवढं वाईट करत येईल तेवढं करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे,, असे सांगून सुभाष देसाई यांनी सांगून काही झाले तरी आम्ही शिवसैनिक डगमगणार नाही, असे सांगितले.


यावेळी अरुण दूधवडकर म्हणाले, . शिवसेनेचे नाव व चिन्ह चोरले तरीही शिवसेना कोणाची असे जरी विचारले तरी शिवसेना ठाकरेंची असेच उत्तर येणार. म्हणूनच शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उपस्थित राहावे, या जिल्ह्यातील तिनही आमदार शिवसेनेचेच निवडून येतील असेही दूधवडकर म्हणाले. यावेळी प्रदीप बोरकर म्हणाले, सिंधुदुर्ग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. संकट येते तेव्हा शिवसैनिक त्वेषाने उभा राहतो, भाजप गलिच्छ राजकारण करत आहे, ज्या व्यक्तीकडे आज करोडोची संपत्ती आहे,त्यांच्यावर धाडी नाही मात्र येथील जनता भाजप आणि गद्दार शिंदे गटाला धडा शिकवलाशिवाय रहाणार नाही पाहिजे .


या वेळी बोलताना अतुल रावराणे म्हणाले ,देवगड चा गड कणखर खंबीर शिवसैनिकांनी राखला असून ठाकरे गटाला मानणारा शिवसैनिक. कोठेही गेलेला नाही त्यामुळे ते निष्ठान्वंत शिवसैनिक आहेत. आगामी जिल्हा परिषद परिषद ,ग्रा प .,निवडणुकीतही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार विजयी होतील असा विश्वासही त्यानी व्यक्त केला.या मेळाव्याच्या निमित्ताने देवगड तालुका महिला आघाडी संघटक हर्षा ठाकूर यांचा वाढदिवस माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.


सुशांत नाईक म्हणाले,देवगड तालुक्यातील शिवसैनिकांनी गड शाबूत ठेवला असून शिवसेनेवर आघात होऊनही तो अभेद्य आहे त्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे.
यावेळी संजय पडते,संदेश पारकर नीलम सावंत पालव यानीव मार्गदर्शन केले यांनीही विचार मांडले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनी केले.

You cannot copy content of this page