⚡सावंतवाडी ता.२६-: आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूलचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्याचा सदिच्छा प्रदान समारंभ विद्यालयात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर सर, गोगटे वाळके महाविद्यालय, बांदा (महाराष्ट्राचे नामवंत कवी) तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक शरद शिरोडकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन,स्वागत गीत, दीपप्रज्वलनने करण्यात आली. त्यांनतर पाहुण्यांचे पार पडले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले शाळेविषयी मनोगत व्यक्त केले. तर शाळेच्यावतीने शिक्षक,विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्था उपाध्यक्ष निलेश परब, अर्जुन मुळीक, मुख्याध्यापक विद्याधर देसाई, शिक्षक लाडू सावंत, अनिल नाईक, समिधा मांजरेकर, देवयानी चव्हाण, श्रद्धा परब, प्राची परब, शिक्षकेतर कर्मचारी तानाजी खोत, लक्ष्मण शेळके, विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते. सूत्रसंचालन तानाजी वरक यांनी केले.
