*विधानसभेच्या वेळी संजू परब दिपक केसरकरांकडे होते पे – रोलवर

तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांचा संजू परब यांच्यावर पलटवार

*💫सावंतवाडी दि.१६-:* विधानसभेच्या शेवटच्या चार दिवसात आमदार दिपक केसरकर यांच्याकडे पे – रोलवर नगराध्यक्ष संजू परब होते. असा पलटवार तालुका प्रमुख रूपेश राऊळ यांनी केला आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या भाजप प्रवेशावर बोलणे म्हणजे संजू परब यांची नौटंकी असल्याचा आरोप देखील रुपेश राऊळ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

आमदार दिपक केसरकर यांच्या भाजप प्रवेशावर बोलून संजू परब हे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यानी केला आहे. विधानसभेच्या वेळी संजू परब यांनी घेतलेली भूमिका ही राजन तेली ना देखील माहित असून, राणेंना देखील त्यांची नौटंकी समजल्याने ते मत्स्य महोत्सवाला उपस्थित राहिले नाहीत. तसेच जो पर्यंत राणे भाजप मध्ये आहेत. तो पर्यंत दिपक केसरकर भाजप मध्ये जाणार नाहीत असे मत देखील त्यानी यावेळी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page