शेतकऱ्यांवर कोसळले द्विधा संकट…

रब्बी भात शेतीला फुलोरा व चिम रोग;वन्यप्राण्यांकडून पिकाचेही नुकसान

*💫कुडाळ,दि.१६-:* शेतकरी आधीच संकटात असल्याने कोरोनाच्या काळात सर्व व्यवसायिक व शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.त्यातच यावर्षी रब्बी भात शेतीला फुलोरा व चिम आल्याने दाणा आलाच नाही.एकिकडे वर्षभर कोरोना संकटात तर दुसरीकडे मेहनत घेऊन भात शेती पिकवली तर संकट आले. करांच काय जीवन जगायच कस, संसाराचा गाडा घाकायचा कसा. शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न व संकट उभे आहे. त्यातच वन्यप्राण्याने शेतकऱ्यांचे सर्व फळ झाड लागवडचे व शेती पिकवलीचे नुकसान करतात आहे.मदतीचा हात कोणाकडे पसरावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे तात्काळ संबंधित विभागाने पाहणी करून पंचनामे करून शासनाकडे पाठवावे नुकसानभरपाई मिळावी हीच आमची मागणी आहे असे आवाहन संबंधित गावातील शेतकऱ्यांनी सरकारकडे घातले आहे.

You cannot copy content of this page