*सावंतवाडी नगरपालिकेत चकाचक उपक्रमाचा शुभारंभ

*पाण्याच्या टाक्या साफ करण्यासाठी सुरू करण्यात आला उपक्रम*

*💫सावंतवाडी दि१६-:* सावंतवाडी नगरपालिका, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, रोटरी क्लब आणि क्रेडाई यांच्या सहयोगातून पाण्याच्या टाक्या साफ करण्यासाठी ‘ “चकाचक” उपक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला असून, यासाठी लागणारे यंत्र आज पुणे येथून पाण्याची टाकी साफ करण्यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या दोन युवकांना देण्यात आले आहे. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, रोटरी क्लब चे डॉ. राजेश नवांगुळ, भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page