संजू परब; आपल्या कार्यकाळात झाले होते ठराव; नारायण राणे, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर व राजन तेली यांचे मानले आभार..
⚡सावंतवाडी ता.२२-: महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत सावंतवाडी शहरातील विविध कामांसाठी 7 कोटी 34 लाख रुपये मंजूर झाले असून आपल्या कार्यकाळात या कामांचे ठराव मंजूर करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण नारायण राणे मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या सततच्या पुराव्यामुळे हे यश आल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब आज थेथे दिली.
दरम्यान ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्राच्या ठिकाणी सभागृह उभारणे ,डोंगरे पाणंद येथे बहुउद्देशीय सभागृह उभारणे, बाहेरचा वाडा येथे बहुउद्देशीय सभागृह उभारणे जिमखाना मैदान सपाटीकरण करण्याबरोबर रस्त्यांची डांबरीकरण अशी विविध कामे यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे या कामाचा फायदा शहरातील नागरिकांना होणार आहे असेही परब यावेळी बोलताना सांगितले.
