सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट

विविध प्रश्नांवर चर्चा करत सादर केले लेखी निवेदन

बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षक इत्यादी निवृत्याना सप्टेंबर 2022 पासून निवृत्ती वेतन सरासरी दुसऱ्या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत अदा केले जात आहे. यासाठी निवृत्त कर्मचारी यांच्या विविध संघटना काम करीत आहेत. नुकतीच सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक सेवाभावी संस्था सावंतवाडी यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना याबाबत लेखी निवेदन दिले. यावेळी याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पराडकर यांची भेट घेतली.
या निवेदनात त्यांनी म्हटले की, महाराष्ट्र राज्यातून केवळ सिंधुदुर्ग जिल्हातील निवृत्ती वेतनधारकांवर ही वेळ का यावी ? या जिल्हा प्रशासनातील आपण एकमेव जबाबदार अधिकारी आहात देशात महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जात असताना, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन याला अपवाद का? हे निवेदन देईपर्यंत निवृत्ती वेतन बँकेमध्ये कदाचित जमाही झालेले असेल परंतू म्हातारी मेल्याचे दुख: नाही काळ सोकावू नये म्हणून प्रशासन प्रमुख म्हणून आपण काही निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणार आहात काय? कार्यक्षमता न अजमावता व्दितीय तसेच तृतिय श्रेणीतील अधिकारी पदोनतीने भरून प्रशासन त्यांच्या ताब्यात दिल्याने अशा समस्या निर्माण होण्यास तेच जबाबदार नाहीत का, त्यांच्याकडूनच काळ सोकावला जातो आहे याची प्रशासन सेवेतील उच्चपदस्य अधिकाऱ्यांना जाणीव होत नाही काय ? जिल्हा प्रशासन असेच भरकटलेल्या जहाजासारखे दिसत आहे. वेळीच आवर घालावा.
निवृत्ती वेतन वेळीच मिळण्याची व्यवस्था करावी अन्यथा याही पुढे असेच सुरु राहील्यास लोकशाही मार्गाने जे जे उपाय आहेत ते करावे लागतील याला आपण जबाबदार असाल अशा मार्गाने आपण आम्हाला जावू देणार नाही याची अपेक्षा करतो. कृपया वेळीच दक्षता घ्यावी ही विनंती आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर आईर, उपाध्यक्ष अरविंद नेमळेकर, सदस्य द. मा. गवस, महादेव बांदेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page