रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

इन्सुली भाजपने वेधले कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष्य

बांदा/प्रतिनिधी
इन्सुली पागावाडी मार्गे चराठा रस्त्याचे अपूर्ण असलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी इन्सुली भाजपाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण – जाधव यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, सरपंच गंगाराम वेंगुर्लेकर, उपसरपंच कृष्णा सावंत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष उमेश पेडणेकर, जेष्ठ भाजप कार्यकर्ते अशोक सावंत, ग्रा प सदस्य महेश धुरी, नंदू नाईक, प्रविण मुळीक आदी उपस्थित होते. इन्सुली पागावाडी रस्त्याचे काम गेले वर्षभर ठेकेदाराने अपूर्ण ठेवल्याने या रस्याने ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना तसेच पादचाऱ्यांना त्रास होत आहे. काम लवकर न केल्यास ग्रामस्थांच्या वतीने बांधकाम विभागासमोर उपोषणास बसण्याचा इशारा यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी अभियंता चव्हाण यांनी दहा मार्च पर्यत संबधित ठेकेदारा कडुन काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन उपस्थितांना दिले.

You cannot copy content of this page