Headlines

कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणून साजरा करणार

बांदा नटवाचनालयाचा निर्णय

बांदा/प्रतिनिधी
बांदा गावाला सांस्कृतिक वारसा लाभलेल्या नट वाचनालयात सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा गौरव दिन म्हणुन साजरा करण्यात येणार आहे.
मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी त्यानी घेतलेल्या परिश्रमाला अभिवादन म्हणुन सायंकाळी ४.३० वाजता नट वाचनालय बांदा येथे कार्यक्रमाचे आयोजन करम्यात आले आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन माझ्या आठवणीतल्या कविता किंवा स्वरचित मराठी कविता वाचनाचा कार्यक्रम होणार आहे. तरी सर्व मराठी भाषेच्या साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. व हा कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page