*💫सावंतवाडी दि.१५-:* माजी सैनिकांनी केवळ कॅन्टीन चे सामान घेण्यापुरते एकमेकांची भेटीगाठी न घेता यापुढे निवृत्त सैनिक आणि त्यांच्या परिवाराच्या सुखदुःखात सहभागी व्हावे आणि भावी पिढीच्या मनामध्ये देशप्रेमाची ज्योत कायम जागवत ठेवावी असे आवाहन करून सिंधुदुर्ग 17 मराठा इन्फंट्री रूईवाडे 2021 परिवाराच्यावतीने जिल्ह्यातील निवृत्त सैन्य दलातील अधिकारी आणि कर्मचाऱी पुलमावा हल्ल्यातील शहिदाना मानवंदना देण्यासाठी आज एकत्र आले होते ही बैठक सावंतवाडीत आज पार पडली यावेळी ऑर्डिनरी कॅप्टन दशरथ चव्हाण विलास राणे तानाजी गावडे सुभेदार शशिकांत गावडे हवालदार आत्माराम साईल सीएचएम सुरेश गावडे सुभेदार दत्ताराम झेंडे तसेच माजी सैनिक सुभेदार कांता सावंत राजाराम नाईक बापू गावडे दौलत सुतार गुरुप्रसाद राणे चंद्रास यादव संजय तारी दीपक बागवे – मालवण, चंद्रकांत गवस सुमन परब सहदेव राऊळ पुंडलिक राऊळ रामकृष्ण दळवी आदी उपस्थित होते दोन वर्षापूर्वी पुलवावा दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले 40 जवान शहीद झाल्याप्रकरणी 17 मराठा इन्फंट्री च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सिंधुदुर्ग १७ इन्फंट्री मराठा रूईवाडे परिवार च्या वतीने सैन्यदलातुन निवृत्त झालेले सुरेश गावडे आणि प्रथम सैन्यदल आणि नंतर पोलीस दलातून निवृत्त झालेले हवालदार आत्माराम साईल यांचा सत्कार सुभेदार शशिकांत गावडे यांच्या हस्ते करण्यात आला तर दशरथ चव्हाण यांनी सैन्य दलातील भरती होण्याबरोबर परिश्रमाने मोठ्या पदावर ही पोचता येते आणि अधिकारी बनता येते याचा आदर्श तरुणांनी घेऊन सैन्यदलात अधिकारी व्हावे रुबाब आणि सन्मान मिळवणारी देशभक्तीची भावना अधिक रूढ करावी असे आवाहन केले यावेळी या निवृत्त सैनिकांबद्दल गुरुप्रसाद राणे यांनी माहिती दिली त्यांनी सुरुवातीला १७ मराठा इन्फंट्री चा इतिहास राणे यांनी सांगितले ब्रम्हदेश मध्ये झालेल्या युद्धाबदल ची माहिती त्यांनी दिली सत्कार मूर्ती आत्माराम साईल यांनी सैन्य दला बरोबर पोलीस दलामध्ये केलेल्या कामगिरीची माहिती दिली सैन्य दलाच्या निवृत्तीनंतर पोलीस दलात सेवा बजावत असताना मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील कामगिरी आणि डुबलीकेट चलनी नोटांचा कारखाना त्यांनी मद्रास येथे छापा टाकून मशीन सह नोटा छपाई करणाऱ्या सूत्रधारांना ताब्यात घेतले याबद्दल त्यांना पोलीस दलाची दोन रिवार्ड पदकानी सन्मानित करण्यात आले पोलीस दलातून ही ते निवृत्त झाले आहेत त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला यांनी १७ वर्षे सेवा व नंतर पोलीस दलात दोन प्रशंसा रिवार्ड प्रदान केले. ४० वर्षे सेवा केल्याबदल गावडे यांच्या हस्ते सत्कार केला सुरेश गावडे यांनी अतिरेकयाशी केलेला मुकाबला यावेळी ऑर्डीनरी कॅप्टन तानाजी गावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विठ्ठल शेट्ये माजी सैनिकांनी आपली एकी कायम ठेवावी आणि सर्वसामान्यांच्या मनामध्ये देशभक्ती जागवावी असे आवाहन केले यावेळी अधिकारी विजय राणे यांनी यापुढील स्नेहमेळावा 15 नोव्हेंबरला घेण्यात येणार असल्याचे सांगितले विशेष म्हणजे या मेळाव्यामध्ये माजी सैनिक आणि त्यांच्या परिवारांना ही निमंत्रित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला माजी सैनिक परिवारात सर्वांनी सहभागी सहभागी होऊन हा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन केले
*माजी सैनिकांचा स्नेहमेळावा सावंतवाडीत संपन्न
