वाडा येथे सिलेंडरवाहू ट्रक व प्रवासी रिक्षाचा अपघात…

देवगड दि.१५-:* वाडा विष्णूमंदीर येथे उतारावरील वळणावर सिलेंडर भरलेला टड्ढक उलटल्याने अपघात झाला.या अपघातात पलटी झालेल्या टड्ढकची रिक्षेला धडक बसल्याने रिक्षेचेही नुकसान झाले.सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.हा अपघात सोमवारी सकाळी ११ वा.सुमारास झाला. अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनूसार, सिलेंडर भरलेला टड्ढक पडेल येथून देवगडच्या दिशेने येत होता.सोमवारी सकाळी ११ वा.सुमारास वाडा विष्णुमंदीर येथील उतारावरील वळणावर टड्ढक पलटी होवून अपघात झाला.दरम्यान त्याच कालावधीत पुरळ कळंबई येथील भरत दिगंबर गावकर (पुरळकर) हे रिक्षा घेवून घरी कळंबई येथे जात होते.त्यांच्यासमवेत तिघे प्रवाशी होते.पलटी झालेल्या टड्ढकची मागील बाजूने रिक्षेला धडक बसल्याने रिक्षाही कलंडली.सुदैवाने रिक्षेतील कोणालाही दुखापत झाली नाही.मात्र रिक्षेचे सुमारे २५ हजार रूपये एवढे नुकसान झाले.अपघाताची माहिती समजताच देवगड पोलिस घटनास्थळी दाखल झाले मात्र अपघाताची नोंद देवगड पोलिस स्थानकात रात्री उशिरापर्यंत करण्यात आली नव्हती. अपघात झाल्याचे समजताच वाडा येथील सामाजिक कार्यकर्ते उत्तम बिर्जे, संतोष मुळम, योगेश कोकाटे, प्रवीण बिर्जे, अशोक आचरेकर, दशरथ आचरेकर, वसंत आचरेकर, जयवंत qशदे, देवेंद्र आचरेकर, अण्णा घाडी या सर्वांनी अपघातस्थळी धाव घेवून भरलेल्या सिलेंडरची गाडी रिकामी करून एका बाजुला केली.

You cannot copy content of this page