कर्मचाऱ्यांविना ११ दिवस भूमी अभिलेख कार्यालय

कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचा वाया जातोय वेळ आणि पैसा;तात्काळ रिक्त पदे भरण्याची बबन साळगावकर यांची मागणी

⚡सावंतवाडी ता.२१-: येथील तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय गेले 11 दिवस विना कर्मचारी सुरू असून तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, जमीनदार, नागरिकांना या कार्यालयात कोणी नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.

दरम्यान आर्थिक मलिदा दिल्याशिवाय सामान्य लोकांची काम होत नाहीत, अशी या कार्याची ओळख असल्याचा आरोप देखील साळगावकर यांनी यावेळी केला.

You cannot copy content of this page