जिल्हाध्यक्ष राजन तेली:पालकमंत्री भाजपचे आहेत याचा विसर पडू नये
⚡सावंतवाडी ता.१४-: शहरातील भाजी मंडई कॉम्प्लेक्स निर्णयाबाबत पालकमंत्र्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घ्यावा असा सल्ला भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली आज येथे दिला. दरम्यान राज्यात शिंदे व भाजप सरकार असल्याने गावाच्या विकासा संदर्भात एकत्र येऊन चर्चा करण्याची गरज आहे त्याला भारतीय जनता पार्टी देखील कोणताही विरोध करणार नाही मात्र विश्वाचा घेऊनच निर्णय घ्यावे असे हो तेली यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी राजन तेली बोलताना पुढे म्हणाले की नगरपालिकेमध्ये आता जरी प्रशासक असले तरी याआधी भाजपची सत्ता होती याचा विसर केसरकारांना पडता कामा नये असे तेली यावेळी बोलताना म्हणाले दरम्यान व्यापाऱ्यांचे पुनर्वसन व्हायला पाहिजे ही आमची मागणी आहे परंतु एकत्रित रित्या सगळ्यांनी काम करण्याची गरज आहे.आज जरी तुम्ही आमदार असला तरी पालकमंत्री हा भाजपचाच आहे. व्यापाऱ्यांचा व ग्रामीण भागातील लोकांचा नुकसान होता कामा नये याची दखल घेऊन सर्वांशी एकत्र बसून चर्चा करून निर्णय केसरकरांनी घ्यावा असे राजन तेली यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी नगराध्यक्ष संजू परब;अजय गोंदावळे,आनंद नेवगी,मनोज नाईक,आदी उपस्थित होते.
