अर्थसंकल्प परिसंवाद, जिल्हा कार्यकारिणी बैठकीचे आयोजन

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती

⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठक व अर्थसंकल्प परिसंवाद कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, परिसंवाद कार्यक्रममध्ये केंद्र सरकार व राज्य सरकारचे लाभ तळागाळा पर्यत पोहचले पाहिजे. यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे ते बोलताना म्हणाले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी परिसंवाद कार्यक्रमाला आमदार नितेश राणें, माजी खासदार निलेश राणें व प्रमोद जठार उपस्थित राहणार असल्याचे तेली म्हणाले.

यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब,शहराध्यक्ष अजय गोंदावळे,आनंद नेवगी,मनोज नाईक,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page