आचऱ्यात झाडावरुन पडून एकाचा मृत्यू…

⚡मालवण ता.११-: आचरा वरचीवाडी येथे काल शुक्रवारी सायंकाळी पाले हसन झाडाच्या फांद्या तोडत असताना झाडावरुन पडल्याने गंभीर जखमी झालेल्या आनंद वासुदेव वर्देकर (वय-४८) रा. वर्दे- कुडाळ यांचा मृत्यू झाला. याबाबतची खबर सुशांत आचरेकर यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे.

याबाबत आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार- आचरा वरचीवाडी येथील सुशांत आचरेकर यांच्याकडे
आनंद वर्देकर हा माडावरचे नारळ काढण्यासाठी व जंगली झाडांची साफसफाई करण्यासाठी गेले होता. संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुशांत आचरेकर यांच्या घराजवळील पालेहसनीच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना अचानक ते झाडावरुन खाली पडले. आचरेकर यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे आणले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आचरा पोलीसांनी मृतदेह शवविच्छेदनसाठी येथे आणला. याबाबत अधिक तपास आचरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुकाराम पडवळ करत आहेत.

You cannot copy content of this page