सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचा आनंद मेळावा १५ रोजी

⚡वेंगुर्ला ता.१४-: सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन, तालुका शाखा वेंगुर्लेचा आनंद मेळावा बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी ७५ वर्षे पूर्ण झालेल्या तालुक्यातील सभासदांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाध्यक्ष व सदस्य संघटनात्मक मार्गदर्शन करतील. सभासदांनी आपली निवेदने आणणे अपेक्षित आहे. सभासदांच्या शकांचे निरसन केले जाईल. तरी वेंगुर्ला तालुक्यातील सेवानिवृत्त प्राथमिकांनी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष दिलीप प्रभूखानोलकर व सचिव राजेंद्र बेहरे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page