जिव्हाळा सेवाश्रमाचा वर्धापनदिन १३ व १४फेब्रुवारी ला

विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळीच्या जिव्हाळा सेवाश्रमचा सातवा वर्धापनदिन रायवाडीमाड्याचीवाडी येथे १३ व १४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.हा कार्यक्रम विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
“जिव्हाळा सेवाश्रम” च्या यशस्वी वाटचालीस ७ वर्षे पूर्ण होत आहेत. या वर्षाच्या कालावधीत आपणा सर्वांच्या सहकार्याने व सदिच्छाने जिव्हाळा सेवाश्रमाने सर्वांच्या मनात जिव्हाळ्याचे स्थान निर्माण केले आहे.यानिमित्त जिव्हाळा सेवाश्रमाचा ७ वा वर्धापन दिन मंगळवार दि. १४ फेब्रुवारी २०१३ रोजी आयोजित करण्यात आला आहे . या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उद्योजक शाम सारंग हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत भा. रासम पोलिस उपनिरिक्षक, सेवानिवृत मुंबई, मुणगे-देवगड, कार्यक्रम अध्यक्षस्थानी पाट डॉ. दिपक ठाकूर, प्रमुख उपस्थिती माड्याची वाडी सरपंच सचिन गावडे, कुडाळ प.स.सदस्य डॉ. सुबोध माधव, अनुप नाईक, जि.प. सदस्या श्रीमती वर्षा कुडाळकर, माड्याची वाडी पोलीस पाटील चंद्रशेखर परब, अनुप नाईक, देवेंद्र नाईक, डॉ. हर्ष सागावकर, रघुवीर मंत्री , देवदत्त उर्फ आबा पुजारे, डॉ. दत्तात्रय देसाई, रामकृष्ण उर्फ बाळा सामंत , चंद्रकांत गडेकर, मोहन आरोंदेकर, सुरेश मोरजकर, बादल चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोमवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वा. कार्यक्रमाचे उद्घाटन, सकाळी११ वा. महिलांसाठी पैठणीचा खेळ,दुपारी १ वा. स्नेहभोजन, दुपारी ३ वा. ह.भ.प. ऋचा संजय पिळणकर, माणगांव यांचे किर्तन, संध्या ४ वा. तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा, मंगळवार दि. १४ फेब्रुवारी सकाळी १०.३० वा. चिं. अन्वेष बिजे याच्या वाढदिवसानिमित्त आश्रमातील लाभार्थीना फळवाटप, सकाळी ११ वा. फनीगेम, दुपारी १ वा. स्नेहभोजन,दुपारी ३ वा. ह.भ.प. भाऊ नाईक, वेतोरे यांचे सुश्राव्य किर्तन, सायं. ६ वा. मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण कार्यक्रम व चि. अन्वेष बिर्जे याचा वाढदिवस ,सायं. ७ वा. बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘वेडा चंद्रहास’, आदी कार्यक्रम होणार आहेत.तर या सेवाभावी सोहळ्यास सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष
सुरेश बिर्जे, उपाध्यक्ष राजू बिर्जे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page