चिपळूण च्या महोत्सवात बांद्यातील अलाइव्ह स्टेच्यु ग्रुप च्या कलाकारांची छाप

बांदा/प्रतिनिधी
रोटरी क्लबच्या वतीने आयोजित चिपळूण महोत्सवात बांदा येथील सुप्रसिद्ध येथील अलाईव्ह स्टॅच्यू ग्रुपच्या कलाकारांनी विविध स्टॅच्यू सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली. ग्रुपला मिळालेल्या प्रोत्साहन रकमेतून जि. प. शाळा भोम आदवडेवाडी (ता. चिपळूण) प्रशाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत ग्रुपच्या सदस्यांनी एक आदर्श समाजासमोर ठेवला.
यावेळी ग्रुपचे संयोजक मनोज कल्याणकर आणि प्रशांत सावंत यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विवेक आंबिये, मंदार सावंत, योगेश सावंत, भाई म्हाडगुत, अनुज बांदेकर, उर्वेश पावसकर, सिद्धेश देसाई, मंदार देसाई, विलास कोरगावकर, सिद्धेश शेवडे, अक्षय मयेकर, रणजीत बांदेकर, आशुतोष भांगले, रुपेश सावंत, गुरु बांदेकर, बाळा पेडणेकर, सर्वेश येडवे, पप्या निब्रे,अनिकेत येडवे, सागर तेली, सूर्या निब्रे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मनोज कल्याणकर म्हणाले की, ग्रुपच्या वतीने ठिकठिकाणी आयोजित कार्यक्रमात विविध स्टॅच्यू सादर केले जातात. या कलेला रसिकाकडून देखील प्रोत्साहन मिळते. यावेळी गोळा होणाऱ्या प्रोत्साहन रकमेतून विविध सामाजिक व शैक्षणिक कार्य करण्याचा निर्णय आम्ही घेतला. याच माध्यमातून आम्ही या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. भविष्यात देखील शैक्षणिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
ग्रुपचे कलाकार २०, २१ व २२ फेब्रुवारी रोजी गुहागर पर्यटन महोत्सवात आपली कला सादर करणार आहेत.

You cannot copy content of this page