सरपंच शिवाजी परब यांनी महेश सारंग यांच्या उपस्थितीत केला प्रारंभ
⚡सावंतवाडी ता.११-: येथील जलजीवन मिशन अंतर्गत मौजे आंबेगाव येथे मंजुर झालेल्या नळयोजना कामाचे भूमिपूजन आज आंबेगावचे सरपंच शिवाजी परब यांच्या हस्ते व जिल्हा बँक संचालक तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश जी सारंग यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी बोलताना भाजपा नेते महेश सारंग म्हणाले की मोदी सरकारच्या या योजनेमुळे गावातील प्रत्येक कुटुंबाला मुबलक प्रमाणात पाणी मिळेल.काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे असेही ते म्हणाले.
यावेळी नायब तहसिलदार श्री विजय वरक ,उपसरपंच श्री रमेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश गवळी,सौ आनंदी मुळीक, सौ साक्षी राऊळ,श्री दिपक बर्वे ग्रामसेवक श्री अमित राऊळ, पो. पाटील श्री लक्ष्मण गावडे, माजी सरपंच श्री नामदेव परब, माजी सरपंच सौ. वर्षा वरक, जमीन मालक जनार्दन लांबर, सुनंदा लांबर, भाजपा बूथ अध्यक्ष संतोष राणे, तुकाराम राऊळ, संजू गावडे, अण्णा केळुसकर,लक्ष्मण कडव,रवी गावडे, महादेव गावडे,राजेंद्र केरकर, आदि ग्रामस्थ, महिला वर्ग उपस्थित होते.
