कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील श्री देव रामेश्वर उत्सव मंडळ, बांबुळीच्या वतीने श्री देव ब्रह्मेश्वर मंदिर येथे महाशिवरात्र उत्सव शनिवार दि. १८ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त रविवार दि. १२ ते मंगळवार दि. १८ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. १२ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० ते ९.३० वा. स्थानिक मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, रात्रौ ९.३० ते १०.३० वा. श्री देवी सातेरी महिला ग्रुप यांचा फुगडी कार्यक्रम, सोमवार दि. १३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वा. श्री देव सिध्देश्वर दशावतार नाट्यमंडळ बांब यांचा नाट्यप्रयोग, मंगळवार दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ७.३० ते ८.३० वा. किर्तन ह.भ.प. श्री. मुंडले बुवा, रात्रौ ८.३० वा. नेरूर सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरुर यांचा नाट्यप्रयोग सौजन्य देऊळवाडी मित्रमंडळी, बुधवार दि. १५ फेब्रुवारी रोजी सायं. ७:३० ते ८.३० वा. किर्तन ह.भ.प. श्री. मुंडले बुवा, नेरूर
रात्रौ ८.३० वा. खेळ पैठणीचा हा खेळ बांव व बांबुळी मर्यादित असणार आहे.दि. १४ फेब्रुवारी २०१३ रोजी पर्यंत सहभागी महिलांनी नाव नोंदणी शरद गो. परब, प्रशांत परब, नारायण चेंदवणकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन श्री देव रामेश्वर उत्सव मंडळ, बांबुळीच्या वतीने करण्यात आले आहे.
बांबुळीत श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाच्या वतीने महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन…
