कृष्णाई चषक क्रिकेट स्पर्धा;
युनियन क्लब जिमखाना बेळगाव उपविजेता
बांदा/प्रतिनिधी
सावंतवाडी जिमखाना मैदानावर ११ वर्षाखालील कृष्णाई चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात एम क्रिकेट अकादमी संघाने युनियन क्लब जिमखाना बेळगाव संघावर ४६ धावानी मात करत विजेतेपद मिळविले.
स्पर्धेचे उदघाट्न सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी एम क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष अक्रम खान, जिल्हा लेदर बॉल क्रिकेटचे कार्याध्यक्ष श्री. चोडणकर, नंदू रेडकर, स्पर्धेचे प्रयोजक उपेश नेवगी आदी उपस्थित होते.
अंतिम सामन्यात एम क्रिकेट संघाने निर्धारित ३० षटकात ६ गडी बाद १४५ धावा केल्या. यात फरान आग ३२, प्रसाद नाईक ३२, ओम मेस्त्री १८, सचिन गावडे १० व उस्मा खान याने नाबाद १९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल जिमखाना बेळगाव संघाने सर्वबाद ९९ धावा केल्या. उस्मा खान हिने २, रितिका बुरुड २, तर अगस्त आजगावकर याने ३ गडी बाद केलेत. सावंतवाडी संघाने ४६ धावानी विजयी होत कृष्णाई चषकावर आपले नाव कोरले.
