सावंतवाडी एम क्रिकेट अकदमीचा खेळाडू
बांदा/प्रतिनिधी
गोवा राज्याच्या १४ वर्षाखालील रणजी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी सावंतवाडी येथील एम क्रिकेट अकादमीचा खेळाडू रेहान केरकर (रा. कोरगाव-गोवा) याची निवड झाली आहे. रेहान हा अष्टपैलू खेळाडू म्हणून परिचित आहे.
गोवा राज्य संघाची निवड चाचणी पार पडली. यामध्ये रेहानची पहिल्या ४० खेळाडू मध्ये निवड झाली. त्यानंतरच्या मैदानी निवड चाचणी सामन्यात त्याने १००, ६१ व ५८ धावा काढल्या. शतक व सलग दोन अर्धशतक यामुळे त्याची अंतिम १४ खेळाडूंत निवड झाली.
रेहान हा सावंतवाडी येथील एम क्रिकेट अकादमीत प्रशिक्षक राहुल रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहे. त्याची फलंदाजी व गोलंदाजी मध्ये आमुलाग्र बदल झाला. त्याने प्रथमच गोवा राज्याच्या निवड चाचणीत सहभागी घेत अप्रतिम कामगिरी केली. त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे त्याची गोवा राज्य संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली.
गोवा राज्य संघ तामिळनाडू येथे हैद्राबाद, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, मेघालय यांच्या विरुद्ध सामने खेळणार आहे. रेहानच्या निवडीबाबत अकादमीचे अध्यक्ष उदय नाईक, उपाध्यक्ष अक्रम खान यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो :-
रेहान केरकर.
