सावंतवाडी पोलिसांची कारवाई; दोघांवर गुन्हे दाखल
⚡सावंतवाडी ता.०९-: बेकायदेशीर वाळू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी दोन डंपरवर मध्यरात्री कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर यांनी केली आहे. सदर डंपर चालकांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
