साहित्यिक डॉ रुपेश पाटकर यांना प्र श्री नेरूरकर साहित्य स्मृती पुरस्कार जाहीर

नट वाचनालयाच्या वतीने होणार सन्मान

बांदा/प्रतिनिधी
बांदा नट वाचनालयाच्या वतीने दिला जाणारा प्र. श्री. नेरुरकर साहित्य स्मृती साहित्य पुरस्कार यावर्षी येथील प्रतिथयश साहित्यिक डॉ. रुपेश पाटकर यांना जाहिर झाला आहे. १४ फेब्रुवारी रोजी (कै.) प्र. श्री. नेरूरकर यांच्या जयंतीदिनी सायंकाळी ४ वाजता या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
वाचनालयच्या सभागृहात नेरुरकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. गेली १० वर्षे सातत्याने हा कार्यक्रम वाचनालयाच्या वतीने साजरा करून कै. नेरूरकर यांच्या आठवणीना उजाळा दिला जातो. या कार्यक्रमात दरवर्षी प्रतिथयश साहित्यीकाला (कै.) प्र. श्री. नेरुरकर स्मृती पुरस्कार बांदा वाचनालयाच्या वतीने दिला जातो.
यंदाचा हा पुरस्कार येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा मनोविकारतज्ञ डॉ. रूपेश आनंद पाटकर यांना जाहीर झाला असुन त्यांना मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सन्मानीत केले जाणार आहे. श्री पाटकर यांचे आतापर्यंत अनेक साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांनी विविध पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांनी गोव्यात मराठी वृत्तपत्रांसाठी अनेक संपादकीय लेख प्रसिद्ध केले आहेत. त्यांनी लहान मुलांच्या मनाचा वेध घेत लिहिलेल्या “बबलूची डायरी” या पुस्तकाला लहान मुलांमध्ये विशेष प्रसिद्धी मिळाली आहे.
तरी या कार्यक्रमास सर्व साहित्यीक प्रेमी व कै. प्र. श्री. यांच्या विद्यार्थानी, बांदावासीयानी उपस्थित रहावे असे आवाहन बांदा नट वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सचिव राकेश केसरकर यांनी केले आहे.
फोटो :-
डॉ. रुपेश पाटकर.

You cannot copy content of this page