भिवा म्हाडेश्र्वर याला आंतर राष्ट्रीय स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रजत पदक

गोवा येथील पॅसिफिक इंटरनॅशनल मास्टर एथलिट चॅम्पियन स्पर्धेत मिळविले सोनेरी यश

बांदा/प्रतिनिधी
गोवा येथे झालेल्या पॅसीफिक इंटरनॅशनल मास्टर एथलीट चॅम्पियनशिप स्पर्धेत माणगाव (ता. कुडाळ) येथील भिवा तुकाराम महाडेश्वर याने भारताचे प्रतिनिधित्व करताना २ सुवर्ण व १ रजत अशी एकूण ३ पदके पदक मिळवून दिलीत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण यश मिळविलेल्या महाडेश्वर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांनी या स्पर्धेत ११० मिटर हर्डल्स मध्ये सुवर्ण, लॉन्ग जम्प मध्ये सुवर्ण तर १०० मिटर धावणे मध्ये रजत पदक मिळविले. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर ३५ वर्षे वरील गटात घेण्यात आली होती. महाडेश्वर यांनी आतापर्यंत विविध राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत पदके मिळविली आहेत.

You cannot copy content of this page