मंत्री केसरकर मित्र मंडळाचे आयोजन
⚡सावंतवाडी ता.०८-: महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नामदार दीपक केसरकर मित्र मंडळाच्या वतीने कॅन्सर निदान शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी 9 फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता हे शिबिर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये कोल्हापूर येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे नामवंत तज्ज्ञ डॉक्टर्सकडून कर्करोग निदान व मार्गदर्शन करण्यात येणार आहे तरी या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन दीपक भाई केसरकर मित्र मंडळाच्या वतीने प्रसन्न उर्फ नंदू शिरोडकर यांनी केले आहे.
