मिलाग्रीस स्कूल व ज्युनियर कॉलेजचे आंतरराष्ट्रीय इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेत यश…

⚡सावंतवाडी ता.०८-: मिलाग्रीस स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ‘नॅशनल सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन’ यांच्या माध्यमातून सन 2022 या वर्षात घेण्यात आलेल्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेमध्ये उत्तम यश संपादन केले आहे. या परीक्षेसाठी प्रशालेमधून 56 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते व सर्व विद्यार्थी उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाले, यापैकी 14 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.

यामध्ये साची टोपले (5C), रुची गावडे (6D), हफीझा नाईक (6D), भार्गवी कानविंदे (6D), शेनाईस अल्मेडा (6C), कृष्णा पास्ते (7D), नेहल तुळस्कर (7D), निधी कानविंदे (7C) , आदी पाटील (8D), आर्या राणे (8D), सलोनी गावडे (8D), ग्लेन रोड्रीग्स (9C), सुस्मित सावंत(10D) ह्या विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले तर अव्नी भांगले (7C) या विद्यार्थिनीने क्षेत्रीय स्तरावर क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले.
सर्व विद्यार्थ्यांना मिलाग्रीस प्रशानेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदाना यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शन करणारे शिक्षक या सर्वांचे अभिनंदन केले, तसेच विद्यार्थ्यांचे हे यश शाळेसाठी अभिमानास्पद आहे असे म्हटले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page