राष्ट्रवादी नेते अबिद नाईक यांची सामजिक सामाजिक बांधिलकी

जानवली नदी येथे बांधला बंधारा; ग्रामस्थांची गैरसोय दूर

⚡कणकवली ता.०८-: राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी कणकवली शहरातील जानवली नदी गणपती सानाजवळ राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसा निमित्त ‘शरद बंधारा ‘गेली 15 वर्ष पाणी साठवनुकीसाठी व लोकांना येण्या जाण्या बंधारा बांधून सामाजिक बांधीलकी जपली आहे त्याचप्रमाणे ह्या वर्षी.अबिद नाईक यांनी लोकांसाठी स्वखर्चातून बंधारा बांधण्याचे काम चालू केले आहे .
बंधारा बांधतेवेळी जानवली सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे,ग्रामपंचायत सदयस्य दामोदर सावंत,रमेश राणे, नितिन राणे, अनुष्का राणे, दिशा राणे, सुवर्ना मेस्त्री, ग्रामस्थ दिपक दळवी उदय राणे,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत,शहर सरचिटणीस अनीस नाईक,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शेख, शहर उपाध्यक्ष अमित केतकर, शहर चिटनीस गणेश चौगुले, युवक शहर अध्यक्ष निशिकांत कडुलकर, ग्रामस्थ उपस्थित होते
बंधारा बांधल्यामुळे जानवली गावाला व कणकवली शहराला फायदा होतो. जानवलीमधील नळ योजनेची विहिर नदीलगत असल्यामुळे विहिरीची पाण्याची पातळी वाढते व जानवली गावाला पाण्याची टंचाई पाऊस पड़ेपर्यंत भासत नाही त्याचबरोबर कणकवली शहरातील विहिरीची पाण्याची पातळी वाढते त्यामुळे शहरातील पाणी तूटवडा भासत नाही.त्याचबरोबर लोकाना जाण्या येण्यासाठी या बंधाऱ्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो.
बंधाऱ्यामुळे नदीकाठी असणाऱ्या शेतीला मुबलक पाणी मिळते ह्या सर्व गोष्टीमुळे लोकांची अबिद नाईक यांच्याकड़े बंधारा बांधण्याची मागणी असते व ही मागणी अबिद नाईक दरवर्षी पूर्ण करतात. त्याचबरोबर पक्का ब्रिज कम बंधारा होण्यासाठी शासन
स्तरावर प्रयत्न केले आहेत असे अबिद नाईक यांनी सांगितले .त्यावेळी उपस्थित सर्व लोकांनी अबिद नाईक यांच्या समाज बांधीलकी व कार्याबद्द्ल समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page