मोफत चाचण्या आणि उपचार होणार;अधीक्षक डॉ दुर्भाटकर यांची माहिती..
⚡सावंतवाडी ता.०७-: सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिर व महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हा शिबिर दि. ९ रोजी होणार असून या सदर शिबिर मधे सर्व आवश्यक चाचण्या व उपचार मोफत केले जाणार आहेत.
तरी शिबिराचा सामान्य जनतेने लाभ घ्यावा, रक्तदान शिबिरास दात्यानी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन उप जिल्हा रुग्णालय चे अधीक्षक डॉ दुर्भटकार यांनी केले आहे.
या आरोग्य शिबिरसाठी तज्ञ उपस्थित असणार आहेत जनरल फिजिशियन व मेंदू विकार तज्ञ – डॉ अंबापूर्कर, जनरल सर्जन डॉ गिरीश चौगुले, अस्थिरोग तज्ञ – डॉ निखिल अवधूत स्त्रीरोग तज्ञ – डॉ दुरभटकर आयुर्वेदिक तज्ञ – डॉ दीपक लादे, डॉ सागर जाधव
बालरोग तज्ञ डॉ संदीप सावंत उपस्थित राहणार आहेत
