अध्यक्ष एस ओ डिसोजा यांचे आवाहन
मालवण दि प्रतिनिधी
विविध समस्या सोडविण्यासाठी संघटना अधिक मजबुत करणे आवश्यक आहे म्हणून ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी जास्तीत जास्त नवीन सदस्य नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एस. ओ. डिसोजा यांनी येथे बोलताना केले.
ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशनच्या मालवण शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष अस. ओ. डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत संघटनेचे सचिव श्री. प्रमोद मोहिते यांनी संघटना बांधणीवर चर्चा करताना नवीन सदस्य नोंदणी तसेच निधी बाबत विचार मांडून संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. प्रारंभी एम. डी. जोशी यांनी उस्थितांचे स्वागत केले.
यावेळी शासनाकडून अपेक्षित असलेल्या वेतन विषयक सुधारणा आणि त्याची अंमलबजावणी यावर साधक बादक चर्चा करण्यात आली. तर एम. डी. जोशी यांनी पेन्शनच्या नविन ऑडर्सची माहिती. विशेष करुन शारिरीक, मानसिक दृष्ट्या अपंग असलेल्या मुला-मुलींना मिळणाऱ्या सवलती, घटस्फोटित, विधवा / अविवाहित मुलींना मिळणाऱ्या पेन्शनबाबत माहिती/८० वर्षावरील पेन्शनर/फॅमिली पेन्शनरांना मिळणाऱ्या अधिक पेन्शनबाबत माहिती आणि मंजूर केसिसबाबत माहिती दिली. यावेळी वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या स्मिता दिगंबर पारकर, श्री. यशवंत आर गावकर, श्री. रामजी अनंत गावकर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी एस. ओ. डिसोजा यांनी आभार मानले.
