संशयतांनी दिली कबुली:आणखी दोघांना अटक
सावंतवाडी
आंबोली घाटात घडलेल्या खून प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखीन दोघांना ताब्यात घेतले आहे. स्वानंद भारत पाटील (३१) रा. इस्लामपूर सांगली राहूल बाळासाहेब पाटील (२८) रा. वाळवा सांगली, अशी त्यांची नावे आहेत. त्यामुळे या प्रकरणात आत्ता एकून सात संशयित झाले आहेत. तर आपण प्लान करुनच त्याचा खून केला. तसेच लाठ्या-काठ्या व कंबर पट्ट्यासह उसानेही मारहाण करण्यात आल्याने सुशांतचा मृत्यू झाला असल्याची कबूली त्यांनी पोलिसांना दिली. दरम्यात अटक करण्यात आलेल्या पाच ही जणांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. तर आता या प्रकरणाचा पुढील तपास कराड आणि पंढरपुरमध्ये करण्यात येणार आहे. याबाबतची माहीती उपविभागीय पोलिस अधिकारी रोहीणी सोळंके यांनी दिली.
त्या म्हणाल्या, या प्रकरणात आणखीन काही जण असल्याचा आम्हाला संशय होता. त्यानुसार आम्ही सखाले चौकशी केली. यात अटकेत असलेल्या तुषार पवार याच्याकडे तपास केला असता त्या गुन्ह्यात आणखी काही जण असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आम्ही पुढील तपासाला सुरवात केली. यावेळी ही आणखी पाच नावे उघउ झाली. त्यामुळे या गुन्ह्यात मृत्यू झालेल्या खिल्लारे याला एकुण सात जणांनी मारहाण केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील भाउसो माने हा खिल्लारे याचा मृतदेह घाटात टाकत असताना दरीत कोसळून स्वतःच मृत्यूमुखी पडला. दरम्यान काल अभय बाबासो पाटील (३५),प्रविण विजय बळीवंत (२५) व राहूल कमलाकर माने (२३) या तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडे चौकशी केल्यांनतर अन्य दोघांची नावे उघड झाली होती. त्यानुसार त्या दोघांना रात्री उशिरा ताब्यात घेण्यात आले. दरम्यान या प्रकरणात आणखी काही तपास करायचा आहे. तसेच त्यांचा या खूना मागे आणखीन काही उद्देश होता का ? याबाबत अधिक तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांना सात दिवसाची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी केली होती. त्यानुसार त्यांना सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहे
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके पोलीस सचिन कोयंडे अमित राऊळ काका कुडतरकर सुरज पाटील गजानन देसाई भूषण भोवर आधी पोलिसांचे पथक कराड येथे काल दाखल झाले होते त्यांनी काल रात्री उशिरा त्यांना अटक केली होती
