बांदा केंद्र शाळा नंबर १ चा विद्यार्थी
बांदा/प्रतिनिधी
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई यांच्यावतीने “माझा आवडता राष्ट्र पुरुष” या विषयावर आयोजित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत येथील जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ चा विद्यार्थी समर्थ सागर पाटील याने लहान गटात राज्यात प्रथम क्रमांक मिळविला.
प्रशाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर, वर्गशिक्षिका शुभेच्छा सावंत, आई वडील सौ राणी सागर पाटील व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, उपाध्यक्ष श्रद्धा नार्वेकर, सरपंच प्रियांका नाईक यांनी अभिनंदन केले आहे.
फोटो :-
समर्थ पाटील.
