मानसीश्र्वर जत्रेला विकलेल्या पूजेच्या साहित्य विकून केली कमाई

नवाबाग शाळेच्या मुलांचा उपक्रम

⚡वेंगुर्ला ता.०६-: उभादांडा येथील प्रसिद्ध श्रीदेव मानसीश्वरच्या जत्रौत्सवात पूजा साहित्याची विक्री करुन नवाबाग शाळेच्या स्काऊट गाईड व कब बुलबुल पथकाच्या मुलांनी ख-या कमाईचा आनंद लुटला. भाविकांनीही या मुलांकडील साहित्य खरेदीस प्राधान्य दिले.

कब बुलबुल व स्काऊट-गाईडच्या पथकामध्ये तन्मय मोर्जे, अथर्व तारी, पद्न्या आरावंदेकर, तनिष गिरप, दिपराज तांडेल, मैथिली केळुसकर, प्रांजल मसुरकर, रामकृष्ण कुबल, भाग्येश जाधव, रामचंद्र तांडेल, निरज मोर्जे, अश्विन मोटे, गाथा कोळंबकर, धीरज मोर्जे, विरेन तांडेल, चिन्मई मोर्जे, ओंकार केळुसकर आदींचा समावेश होता.
या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका तथा गाईड कँप्टन तन्वी रेडकर, कब मास्टर रामा पोळजी, शिक्षिका प्राजक्ता आपटे, शिक्षक मारुती गुडुळकर यांनी परिश्रम घेतले. तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादा केळुसकर, उपाध्यक्ष दत्ताराम कोळंबकर, सदस्य वसंत तांडेल, मनोहर तांडेल व इतर पालकांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमास सिधुदुर्ग जिल्हा स्काऊट-गाईड संघटक गायकवाड, मिशाळ, माजी जिल्हापरिषद सदस्य दादा कुबल, शिक्षक व विविध क्षेत्रातील लोकांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या व उपक्रमाचे कौतुकही केले.
फोटोओळी – कब बुलबुल व स्काऊट-गाईडच्या पथकाच्या पूजा साहित्य विक्रीच्या उपक्रमास माजी जिल्हापरिषद सदस्य दादा कुबल यांनी भेट देऊन कौतुक केले.
न्यू इंग्लिश स्कूलचे पारितोषिक वितरण ७ रोजी
वेंगुर्ला प्रतिनिधी- उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ ७ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. साई मंगल कार्यालय येथे संपन्न होणार आहे.
याच कार्यक्रमात उभादांडा सरपंच, सदस्यपदी निवड झालेल्या स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन विरेंद्र कामतआडारकर, सरपंच निलेश चमणकर आणि माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन स्कूलतर्फे केले आहे.

You cannot copy content of this page