⚡बांदा ता.०६-: बांदा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ येथे इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या व एकलव्य अकॅडमी येथे अबॅकसचे प्रशिक्षण घेत असलेल्या स्वरा दिपक बांदेकर हिने पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुयश प्राप्त केले.
स्वरा बांदेकर ही बांदा येथील एकलव्य अकॅडमीमध्ये शिक्षिका स्नेहा केसरकर हिच्या मार्गदर्शनाखाली अबॅकसचे प्रशिक्षण घेत असून स्वराने यापूर्वी डिसेंबर महिन्यात सांगलीतील इस्लामपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत स्पर्धेत प्रथम क्रमांक तसेच ८जानेवारी रोजी झालेल्या ऑनलाइन स्पर्धेत सुयश मिळवल्याने पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेसाठी तीची निवड झाली होती.
ही स्पर्धा पुणे येथी झाली या स्पर्धेत तिने दर्जेदार कामगिरी करत दुसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तीला ट्राफी देऊन गौरविण्यात आले.
स्वराला एकलव्य अकॅडमीच्या स्नेहा केसरकर बांदा केंद्र शाळेतील शिक्षक वंदना शितोळे,गोपाळ साबळे,जे.डी.पाटील, रंगनाथ परब, प्रशांत पवार, उर्मिला मोर्ये,सरोज नाईक,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत ,जागृती धुरी, प्राजक्ता पाटील,शितल गवस व पालक दिपक बांदेकर व साक्षी बांदेकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.तिने मिळवलेल्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर , केंद्र शाळा मुख्याध्यापक श्रीकांत आजगावकर .बांदा सरपंच प्रियंका नाईक यांनी अभिनंदन केले असून स्वराने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
