रामभाऊ म्हाळगी सभागृह येथे प्रशिक्षणासाठी सरपंच झाले रवाना

⚡कणकवली ता.०५-: आम. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कणकवली-देवगड- वैभववाडी सरपंच यांचे प्रशिक्षण शिबिर रामभाऊ म्हाळगी सभागृह,उत्तन, भाईंदर(पश्चिम) जिल्हा – ठाणे येथे आयोजित केले आहे,त्यासाठी कणकवली येथून सरपंच यांना कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या सोबत भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,कणकवली खरेद-विक्री संघ अध्यक्ष प्रकाश सावंत,भाजप शहर अध्यक्ष अण्णा कोदे,सुशील पारकर व सरपंच उपस्थित होते.

You cannot copy content of this page