पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ राणे, निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे यशस्वी नियोजन
सिंधुदुर्ग दि.०४-:
प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधत तसेच मुंबई महानगर पालिकेची निवडणूक डोळ्या समोर ठेवून जत्रेसाठी येणाऱ्या लाखो भाविकांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेला “आनंद मेळावा” यशस्वी झाल्याची चर्चा भाजप वर्तुळात व्यक्त होत आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आ नितेश चव्हाण, प्रदेश सचिव निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उत्तम नियोजनमुळे हा मेळावा यशस्वी होवू शकला
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्याला प्रमुख उपस्थिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार, आ प्रसाद लाड, आ नितेश राणे, राज्य सचिव निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रदेश सदस्य दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत आदी यावेळी उपस्थित होते.
