एकनाथ शिंदे यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो;भराडी देवीला पुन्हा केली प्रार्थना-:केंद्रीयमंत्री नारायण राणे
⚡मालवण ता.०३-: गेल्यावर्षी भराडी देवीला प्रार्थना केली. त्यामुळे वर्षभारत ठाकरेंची सत्ता गेली. आमचे सरकार राहू दे व एकनाथ शिंदे यांना दीर्घ आयुष्य लाभो. त्यांची मनातील सर्व इच्छा पुरे होऊदे, अशी प्रार्थना केल्याचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते मालवण येथे श्री भराडी देवीचे दर्शन घेतल्यानंतर येतील जनतेला संबोधित करताना बोलत होते.
यावेळी बोलताना राणें पुढे म्हणाले, की यंदाच्या वर्षी भाविकांना सुलभ पणे प्रवास करायला मिळाला. दर्शन घ्यायला मिळाले. तसेच इकडचे रस्ते देखील चांगल्या प्रकारे केल्याने एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील नेत्यांनी चांगल्या प्रकारे काम केल्याचे यावेळी मंत्री राणे म्हणाले.
