आंबोली आजरा तीठा येथे गतिरोधक घालावा

सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांची मागणी

⚡आंबोली, ता.०४-: येथील सावंतवाडी बेळगाव रोड आंबोली आजरा तिठा येथे जास्त अपघात होतात त्यामुळे त्या ठिकाणी गतिरोधक घालावा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी व आठ दिवसात तात्काळ काम पूर्ण करावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी आलेल्या पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे देखील श्री चव्हाण यांनी विषय मांडला होता पोलिसांना पुन्हा तात्काळ बांधकाम कडे प्रस्ताव देण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.या ठिकाणी अपघात होण्याच्या मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत.संभाव्य धोका लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी अनिल चव्हाण यांनी केली आहे.तसेच वीज वितरण विभागाने देखील रस्त्यावर विजेच्या तारा भाराने खाली आल्या आहेत तसेच कमी उंचीवर आहेत त्याचा सर्व्हे करून तात्काळ रस्ता क्रॉसिंग असणाऱ्या पोलांची उंची वाढवणे गरजेचे आहे .अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page