संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीनिमित्त खेळ पैठणी कार्यक्रम

⚡कणकवली ता.०४-: प.पू. संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सवनिमित्त महिलांसाठी खास आकर्षण म्हणून “खेळ पैठणीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ५ फेब्रुवारी रोजी सायं.५ वा. उबाळे मेडिकल कणकवली समोर सुरु करण्यात येईल. या कार्यक्रमात प्रथम पारितोषिक नक्षीदार पैठणी, द्वितीय पारितोषिक प्रेशर कुकर, तृतीय पारितोषिक ब्लुटूथ डिव्हाईस तसेच सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येतील.

या कार्यक्रमात नावनोंदणी करण्यासाठी सौ. सुप्रिया जाधव- 9420800150 व सौ. मयुरी चव्हाण- 8975800804 यांच्याशी संपर्क करावा.
या कार्यक्रमात असंख्य महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागी व्हावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाजाच्या वतीने करण्यात आले.

You cannot copy content of this page