⚡बांदा ता.०१-: मुंबई गोवा महामार्गावर बांदा बस स्थानकनजिक पंजाबी धाब्यासमोर दुभाजकात सडलेले स्थितीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेह सडलेल्या स्थितीत असल्याने व चेहऱ्याचा भाग विद्रूप झाल्याने त्याची ओळख पटविणे कठीण आहे. परिसरात फिरणारा एखादा वेडसर व्यक्ती असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
मृतदेह विच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. सदरची व्यक्ती मयत होऊन ४ ते ५ दिवसांचा कालावधी लोटल्याने मृतदेह सडलेल्या स्थितीत होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, कर्मचारी विजय जाधव, बाळू गवस, श्रीमती माळकर आधी उपस्थित होते.
बांदा बस स्थानकनजिक सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह
