अंकुरम प्रि स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

कणकवली 1 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- कणकवली येथील अंकुरम
प्रि स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच मोठ्या उत्साहात पार पडले.
प्रशालेतील चिमुकल्यांच्या आजी आजोबांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

नर्सरीच्या चिमुकल्यांची गणेश वंदना कार्यक्रमाच्या प्रारंभी सादर झाली.यानंतर सिनियर केजी ज्युनियर केजीच्या मुलांनीही एकापेक्षा एक नृत्ये सादर करून रसिकांची मने जिंकली.या कार्यक्रमादरम्यान स्कूलच्या वतीने आईंसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यानही गौरविण्यात आले.या कार्यक्रमाला बहुसंख्य पालक विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका गायत्री देवळी यांनी केले.तर सूत्रसंचालन हेमंत पाटकर यांनी केले.

You cannot copy content of this page